बाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते जेम्स हे १८ व्या शतकातील महान संशोधक व मेकॅनिकल इंजिनीअर होते. टॉमस यूकोमेन यांच्या वाफेवरील इंजिनाची प्रतिकृती वॅट यांच्याकडे दुरुस्तीकरता आल्यावर इंलिनाच्या रचनेत विशेष दोष नसल्याचे त्यांना आढळले. मात्र ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडरच्या घनफळाच्या ३-४ पट बाफ असली, तरच दट्ट्या सिलिंडरच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकतो, असे त्याला आढळले. यावर उपाय शोधताना त्यांना अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र वाफेचे द्रवात रूपांतर करणारे साधन जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला महत्त्वाचा शोध ठरला.


वाफेच्या इंजिनाचा शोध त्यांनी लावला हा समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफेची इंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. वॅट यांच्या सुधारणामुळे वाफेचे इंजीन चालविणे सोपे झाले जेम्स वॅट यांचा जन्म १९ जानेवारी १७३६ साली ग्रिनक, स्कॉटलंड




येथे झाला. त्यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता. जेम्सचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले तेथे त्यांनी व्याकरण, गणित, साहित्य तसेच विविध भाषांचे अध्ययन केले अभ्यासापेक्षा त्यांची गोडी यंत्रोपकरणात असल्याने वडिलांच्या कार्यशाळेत असलेल्या यंत्राच्या प्रतिकृती त्यांनी बनविल्या व जहाजांवरच्या उपकरणाची माहिती करून घेतली. वयाच्या १९ व्या वर्षी ग्लासगो व लंडन येथे गणितीय उपकरणाच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले १७५७ साली ग्लासगोला परतल्यावर ते वैज्ञानिक उपकरणनिर्मात म्हणून  ग्लासगो विद्यापीठात काम करू लागले तेथे त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इ. उपकरणे तयार केली वॅटने जॉन रोबकने केलेल्या आर्थिक, साहाय्याने वाफेचे इंजीन बनविण्याचा व्यवसाय १७६९ झाली सुरू केला जॉन रोबकने अर्थसाहाय्य थांबविल्यावर १७७४ साली बर्मिंगहॅमला जाऊन त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफेचे इंजीन बनविण्याचा उद्योग र केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफेच्या इंजिनांची निर्मिती केली एक कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले यामुळे वाफेच्या इंजिनाची मागणी वाढली.


वॅट सतत प्रयोगात मग्न असत बोल्टन यांनी इंजिनातील दट्ट्याच्या पुढे मागे होणाऱ्या गतीचे परिवर्तन करण्याची विनंती केली वॅट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले त्यामुळे इंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय इंजिनाचे नवीन पद्धतीचे संशोधन सुरू केले ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. त्यानंतर वॅटने १७८८ मध्ये इंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित केद्रोस्तारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली दाबमापक शोधला. यामुळे वॅटचे इंजीन परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले


वाफेच्या इंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयातही त्यांनी संशोधन केले होते त्यांना भाषा व संगीतातही रस होता एक वर्षानंतर व्यवसायाची जबाबदारी आपल्या दोन मुलांवर सोपवून ते पुन्हा अधिक सुधारित इंजिनाचा शोध लावण्यात व्यग्र झाले २५ ऑगस्ट १८१९ ला बर्मिंगहॅम येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ विद्युतशक्तीच्या एककास 'वॅट' हा शब्द प्रचलित केला गेला.