मलालाने पाकिस्तानमधील तालिबानींचा आदेश धुडकावून लावत मुलींच्या शिक्षणासाठी बंड पुकारले. परिणाम स्वरूप २०१२ साली तालिबान्यानी मलालाच्या डोक्यात गोळी झाडली. या हत्येतून तिचा निभाव लागला व ती मरणाच्या दारातून परतली.
मलालाचा जन्म १२ जुलै १९९७ साली पाकिस्तानातील मिंगोरा येथे झाला. तहानपणीच तिने मुलांसारखे मुलींनाही शिक्षण मिळावे यासाठी आवाज उठवला. यावर चिडून तालिबानने तिला मारण्याचा प्रयत्नही केला. २०१३ आणि २०१४ साली तिचे नाव नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकित केले गेले. निसर्गरम्य गावात मलालाचा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी हे गाव उन्हाळ्यात
पर्यटकांनी गजबजलेले असायचे. ते आपल्या ग्रीष्म उत्सवासाठीही ओळखले जाते. तालिबानच्या राजवटीमुळे या गावाची शांती भंग पावली आणि पर्यटकांचे येणे बंद झाले ती आपले वडील जियाउद्दिन युसुफजई यांच्या शाळेत शिकत होती जेव्हा तालिबान मुलींच्या शाळांना लक्ष्य बनवू लागले, तेव्हा मलालाने २००८ साली पेशावर येथे केलेल्या भाषणांचे शीर्षक होते, 'तालिबान माझ्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा कशी आणू शकते?"
२००९ साली मलालाने बी. बी. सी. साठी उर्दूत ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आणि जगासमोर तालिबानच्या धमक्या, तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे त्यांचे आदेश जगासमोर आणले आपली ओळख लपविण्यासाठी "गुलमकई' या टोपण नावाने ती लिहित असे. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तिची ओळख सर्वांना समजली. तरीही तिने लिखाण थांबवले नाही. तालिबानने रस्त्यावर खेळणे, टी. व्ही. बघणे, गाणी ऐकणे हे सर्व प्रकार बंद केल्याचे तिने सांगितले. आपल्या ब्लॉगद्वारे तिने लोकांना जागरूक करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरित केले यामुळे संपूर्ण जगतात 'मलाला' हे नाव प्रकाशझोतात आले. तिचे समाजसेवेचे कार्य व शौर्य यासाठी २०११ साली तिचे नाव आंतरराष्ट्रीय बालशाती पुरस्कारासाठी नामांकित केले, पण त्या वर्षी तो पुरस्कार तिला मिळाला नाही. पुढे २०१३ साली
पाकिस्तान सरकारने तिला 'राष्ट्रीय युवा शांती पुरस्कार दिला. मलाला चौदा वर्षांची असताना तालिबानने तिच्या मृत्युदंडाचा फतवा काढला होता. तिचे वडीलही तालिबानच्या प्रचंडविरोधात होते. कुटुंबाला असणारा धोका जाणवूनही त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की तालिबानी एका निरागस मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील. ९ ऑक्टोबर २०१२ साली मलाला शाळेतून घरी येत असताना, एक माणूस तिच्या बसमध्ये चढला आणि मलाला कोण आहे? विचारू लागला. सर्व मुले मलालाकडे बघू लागली. मलाला कोण हे समजल्यावर त्याने तिच्यावर गोळी झाडली. यात दोन मुलीही जखमी झाल्या.
गंभीररीत्या जखमी झालेल्या मलालावर आधी पेशावरच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. पुढे तिला बर्मिंगहॅम इंग्लंड येथे नेण्यात आले. बऱ्याच ऑपरेशनंतर ती पाच महिन्यांनी बरी झाली आणि बर्मिंगहॅम येथे राहून तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. जगभरात तिच्या समर्थकांची संख्या वाढत होती. १६व्या जन्मदिवशी; २०१३ च्या साली अमेरिकेत तिने भाषण केले. 'आय अॅम मलाला' हे आत्मचरित्र २०१३ ऑक्टोबरला प्रकाशित झाले. आजही ती मुलींना शिक्षणाचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आहे. १० ऑक्टोबर २०१३ साली उल्लेखनीय कार्यासाठी युरोपीय संसदेने साखारोव्ह 'पुरस्कार' दिला. मलाला आजही मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे. पण दुर्भाग्याने आजही तालिबानी तिला मारण्यासाठी टपून बसले आहेत.
0 Comments
Post a Comment