पहिल्या महाराणी एलिझाबेथचा जन्म ७ सप्टेंबर १५३३ साली झाला. त्या इंग्लंड आणि आयलँडच्या महाराणी होत्या त्यांचे शासन १७ नोव्हेंबर १५५८ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत होते त्या ब्रिटनच्या ट्यूडर राजवंशाच्या पाचव्या आणि शेवटच्या सम्राज्ञी होत्या त्यांनी लग्न केले नसल्याने त्यांना 'व्हर्जिन क्वीन' या नावाने ओळखले जात असे ब्रिटनचे सम्राट हेन्री आठवा यांची मुलगी असल्याने जन्माने त्या राजकुमारी होत्या, परंतु त्या दीड वर्षांच्या असताना आई एल् बेलिन तिची हत्या केली गेल्याने त्यांना अनौरस, म्हणून घोषित केले गेले इंग्लडच्या राजनैतिक क्षेत्रातल्या अनेक चढउतारानंतर त्या राजसिंहासनावर विराजमान झाल्या


त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याने खूप हुशार व्यक्तींची मंत्री म्हणून निवड केली, ज्यामुळे ब्रिटन सुव्यवस्थित झाले त्यांनी इंग्रजी प्रोटेस्टंट चर्च या ख्रिश्चन शाखेची सुरुवात करून स्वतःला अध्यक्षम्हणून घोषित केले यामुळे त्या ब्रिटनच्या राजनैतिक आणि धार्मिक नेत्याही झाल्या. या घटनेने रोमन कॅथलिक शाखेचे पोप नाराज झाले ते ब्रिटन व हे शब्द धार्मिक गोष्टींबाबतीत आपल्या बाबतीत, ताब्यात आहे असे मानत असत त्याने १५७० साली एलिझाबेथशी प्रामाणिक राहण्याची वागण्याची आवश्यकता नाही, असे आदेश दिले यामुळे ब्रिटनचा कॅथॉलिक समाज एलिझाबेथच्या विरोधात गेला आणि त्यांनी बरेच हल्ले केले, विद्रोह भडकला, पण तरीही एलिझाबेथ आपल्या मंत्र्यांच्या गुप्तचर


सेवेच्या मदतीने सत्तेवर टिकून राहिली १५८८ साली पोपच्या आग्रहाखातर स्पेनने (स्पेन हे एक कॅथॉलिक राष्ट्र होते) ब्रिटनवर सागरी नौकादल घेऊन आक्रमण केले एलिझाबेथच्या नौसेनेने त्यांचा पराभव केला आणि हे यश ब्रिटनच्या ऐतिहासिक यशातील एक मानले जाते.


एलिझाबेथच्या कार्यकाळात ब्रिटिश साहित्य आणि नाटककार बहरले. ज्यात विल्यम शेक्सपिअर, ख्रिस्तोफर मार्ली ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. त्यांच्या कारकिर्दीत ब्रिटनच्या नौसैनिकांनी दूरवरच्या प्रदेशांच्या शोधासाठी प्रवास केले. फ्रान्सिस डेकने उत्तर अमेरिकेचा प्रवास केला. एलिझाबेधच्या ४४ वर्षांच्या कार्यकाळात ब्रिटन शक्तिशाली राष्ट्र म्हणून नावारूपास आले.


३१ डिसेंबर १६०० साली भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या स्थापनेपूर्वीच महाराणी एलिझाबेथने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे एकाधिकार कंपनीला प्रदान केले होते. सुरुवातीला हा अधिकार १५ वर्षांसाठी देण्यात आला. पण कालांतराने २०-२० वर्षांसाठी वाढविण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीत त्यावेळी २१७ भागीदार होते. कंपनीचा प्राथमिक उद्देश त्या प्रदेशावर अधिकार मिळवणे हा नसून व्यापार करणे हा होता.


एलिझाबेथच्या कुशल शासनामुळे ब्रिटनने बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी मिळविल्या होत्या. त्यामुळे ब्रिटन वैश्विक आणि बलाढ्य राष्ट्राच्या रूपात समोर आले. एलिझाबेथ एक उत्तम लेखिका होत्या. त्यांनी ओजस्वी भाषणेही लिहिली. महाराणी एलिझाबेथ (प्रथम) यांचे निधन २४ मार्च १६०३ साली झाले.