महाराष्ट्रात १३व्या शतकात होऊन गेलेले संत कवी ज्ञानेश्वर हे अत्यंत प्रतिभावान होते, तसेच तत्त्वज्ञान आणि काव्य यांबरोबरच आध्यात्मिक अंतर्दृष्टी असलेले महापुरुष होते. ज्ञान, भक्ती आणि योग या तिन्हींचा समन्वय त्यांच्या ठायी होता. १२७५ साली एका सनातन ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला. विठ्ठलपंत व रुक्मिणी हे त्यांचे पिता व माता होते. त्यांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ, धाकटा बंधू सोपानदेव व त्याहून धाकटी भगिनी मुक्ता हेही सगळे फार उच्च कोटीचे आध्यात्मिक विभूती होते लहान वयातच मातापित्यांपासून अंतरल्याने ही मुले मुलेच मिळून जीवन कंठीत होती.

या मुलांना समाजाने वाळीत टाकले होते, कारण त्यांच्या जन्मापूर्वी विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता. मात्र गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी परत येऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला होता. परंतु 'संन्याशाची मुले' हा कलंक या मुलांना फार भोगावा लागला. पैठण क्षेत्री पंडितांच्या समोर ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविल्यानंतरच सर्वांची तोंडे बंद झाली.

अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीच्या काठी नेवासा नावाचे गाव आहे. त्या स्थळी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर उत्स्फूर्तपणे भाष्य निवेदन केले. यावेळी ज्ञानेश्वरांचे वय केवळ १५ वर्षांचे होते. हे भाष्य त्यांचे शिष्य सच्चिदानंदबाबा यांनी लिहून घेतले. त्या भाष्यग्रंथाचे नाव 'ज्ञानेश्वरी' याला 'भावार्थदीपिका' असेही म्हणतात. गीतेवरील या भाष्याला महाराष्ट्रदेशी अत्यंत आदराने सन्मानिले जाते. ज्ञानेश्वरांनी यामध्ये भक्तिमार्गावर अधिक जोर दिलेला आहे त्यांनी आणखी एक तत्त्वज्ञानात्मक असा 'अमृतानुभव' नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे.

एकदा पंढरपुर क्षेत्री ज्ञानेश्वर गेलेले असताना तिथे त्यांची संत नामदेव यांच्याशी गाठ पडली नामदेवांनी त्यांच्याबरोबर उत्तर भारत यात्रा केली. दोघांमध्ये स्नेह निर्माण झाला आळंदीला परतल्यावर ज्ञानेश्वरांनी त्यांचा 'महासमाधी' घेण्याचा मानस बोलून दाखविला. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षे होते महासमाधीची तयारी केली गेली. कार्तिक वद्य त्रयोदशी (इ.स १२९६) या पवित्र दिवशी त्यांनी महासमाधी घेतली आजही ह्या दिवशी हजारो भाविक आळंदीला जमतात. विठ्ठलभक्तांच्या वारकरी पंथाने ज्ञानेश्वर माउलींना नेत्याचे स्थान दिले.

अत्यंत उच्च कोटीचे योगी असूनही मानवतेविषयी, मानवी दुःखाविषयी त्यांच्या मनात अपार करुणा दाटलेली होती आपल्या सर्वसमावेशक आणि अद्भुत अशा गीता - भाष्याच्यानंतर ईश्वराकडे त्यांची काय मागणी असावी?

"दुष्टांची दुष्ट बुद्धी गळून पडो, सर्व जिवांमध्ये प्रेम व मैत्र वाढो! सत्याच्या सूर्याचा उदय होऊन पापाचा अंधार नाहीसा होवो सर्वांची सत्कर्मी रती वाढून सर्वांना तृप्ती लाभो जो आपल्या हृदयी ज्याची इच्छा करील, ते त्याला प्राप्त होवो या विश्वातील सर्व प्राणिजाताला संत सज्जनांची गाठ पडून त्यांचे आशीर्वाद मिळोत!”, ही त्यांची मागणी होती


शिकवण

१ उद्याची वाट न पाहता आपण आजच केलेल्या सर्व कार्याचे फळ ईश्वरार्पण करूया आणि चित्तशुद्धी साधूया जन्ममृत्यूचा फेरा चुकविणारा, दुःखातून व बंधनातून सोडविणारा हाच मार्ग आहे. पूर्ण विचारांती हाच मार्ग खरा आहे. आपण स्वतःला पूर्णार्थाने देवत्वाकडेच उन्नत करीत न्यावे, नाही. अन्यत्र

२. आपल्या वर्तमान जीवनात आपण आपल्या कोणत्याही कृतीने अथवा गुणाने स्वतःला फसवू नये भूमिकेतून बाजूला झालेला नट ज्याप्रमाणे वागतो तसेच जीवनात वागावे काम, क्रोध आणि लोभ हे जिवाला लुटणारे वाटमारे आहेत. जिथे या गुणांचा विकास होईल तिथून नरक जवळ आहे असे खात्रीने समजावे.