ॲडॉल्फ हिटलरचा जन्म २० एप्रिल १८८९ साली ऑस्ट्रियात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंज येथे झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या १७ व्या वर्षों ते व्हिएन्ना येथे गेले कला विद्यालयात प्रवेश मिळण्यास अपयश आल्याने पोस्टकार्डा चित्रे काढून ते उदरनिर्वाह करू लागले तेव्हापासून ते साम्यवाद्यांचा आणि यहुदींचा तिरस्कार करू लागले. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला ते सैन्यात भरती झाले आणि फ्रान्समधील अनेक लढायामध्ये सहभाग घेतला. १९१८ साली युद्धात जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जर्मनीच्या पराजयाचे त्यांना खूप दु:ख झाले
१९१८ साली त्यांनी 'नाझी' सघटनेची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश साम्यवाद्याचे आणि यहुदींचे सर्व अधिकार हिसकावून घेणे हा होता. त्यांच्या सदस्यांमध्ये देशप्रेम खच्चून भरले होते या संघटनेने यहुदींना पहिल्या महायुद्धाच्या अपयशासाठी दोषी ठरवले हिटलरने आपल्या आवेशपूर्ण भाषणाने आर्थिक स्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले यामुळे अनेक जर्मन लोक नाझी संघटनेचे सदस्य झाले. हिटलरने जर्मनीचा विकास, व्हर्सायच्या तहाची समाप्ती, आणि जर्मन साम्राज्याला सुखाचे दिवस येतील, या कल्पना लोकांसमोर ठेवल्या त्यांनी नाझी संघटनेचे चिन्ह 'स्वस्तिक' ठेवले, जे हिंदूचे शुभचिन्ह मानले जाते
१९२३ साली हिटलरने जर्मन सरकारला मुळापासून उपटून फेकण्याचा प्रयत्न केला यांत हिटलर अपयशी ठरला आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला. तिथेच त्यांनी 'माय कोफ' (माझा संघर्ष) नावाचे आत्मचरित्र लिहिले १९३०-१९३२ सालात जर्मनीत बेरोजगारी खूपच वाढली. संसदेत नाझी संघटनेच्या सदस्यांची संख्या २३० झाली. १९३२ साली हिटलर चान्सलरपदी येताच त्याने जर्मन संसद बरखास्त केली. त्यांनी साम्यवाद्यांना बेकायदेशीर घोषित करून देशास स्वावलंबी होण्याचे आव्हान केले. हिटलरने डॉ जोजेफ गोबेल्सना प्रचारमंत्रिपदी नियुक्त केले नाझी संघटनेच्या विरोधकांना तुरुंगात कैद केले. कायदा बनविण्याची सर्व सूत्रे हिटलरने आपल्या हाती ठेवली. १९३४ साली हिटलरने स्वतःला सर्वोच्च न्यायाधीश म्हणून घोषित केले. त्यावर्षी हिडेन बर्गच्या मृत्यूनंतर ते राष्ट्रपतिपदी बसले नाझी संघटनेची दिवसेंदिवस दहशत वाढू लागली. १९३३ ते १९३८ सालापर्यंत नाझौ संघटनेने हजारो यहुदींची हत्या केली होती.
१९३३ साली हिटलरने राष्ट्रसंघ सोडून दिला. भविष्यातील युद्धावर लक्ष केंद्रित करून जर्मन सैन्याचे बळ वाढविण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण जर्मनीस लष्करी प्रशिक्षण दिले गेले १९३४ साली जर्मनी आणि पोलंड यांच्यामध्ये एकमेकांवर आक्रमण न करण्याचा करार झाला त्याच वर्षी नाझी संघटनेने ऑस्ट्रियाचे चान्सेलर डॉलफसची हत्या केली जर्मनीच्या या आक्रमक रूपास घाबरून रशिया, फ्रान्स, झेकोस्लोव्हाकिया, इटली इ देशांनी आपल्या सुरक्षेसाठी परस्परांशी करार केले
त्याचबरोबर हिटलरने ब्रिटनशी करार करून आपली नौसेना ब्रिटनच्या नौसेनेच्या ३५% राहील असे आश्वासन दिले याचा उद्देश भविष्यातील युद्धात ब्रिटनला तटस्थ ठेवणे हा होता. १९३५ साली हिटलरच्या शस्त्रानिर्मितीच्या धोरणासाठी ब्रिटन, फ्रान्स, इटलीने त्यास दोषी ठरले. पुढच्या वर्षात हिटलरने आपल्या सैन्याला फ्रान्सच्या पूर्वेकडील हाइन नदीच्या प्रदेशात अधिकार गाजविण्यासाठी पाठविले. १९३७ साली जर्मनीने इटलीशी करार करून ऑस्ट्रियावर हक्क प्रस्थापित केला. त्यानंतर हिटलरने झेकोस्लोव्हाकियाचा काही भाग घेण्याची इच्छा दाखवली, जिथे बरेचसे जर्मन रहिवासी होते. ब्रिटन, फ्रान्स, इटलीने हिटलरला संतुष्ट करण्यासाठी म्युनिक करार करून झेकोस्लोव्हाकियास हिटलरला ते प्रदेश देण्यास भाग पाडले. १९३९ साली त्यांनी झेकोस्लोव्हाकियावर हक्क प्रस्थापित केला. त्यानंतर हिटलरने रशियाशी करार करून पोलंडच्या पूर्वेचा भाग रशियाला दिला आणि पोलंडच्या पश्चिमेकडील प्रदेशावर 'नाझी'चे राज्य प्रस्थापित केले. ब्रिटनने पोलंडच्या • सुरक्षिततेसाठी आपले सैन्य पाठविले आणि दुसऱ्या महायुद्धास आरंभ झाला.
दुसऱ्या महायुद्धात जेव्हा अमेरिका सहभागी झाली, तेव्हा हिटलरची परिस्थिती • बिघडू लागली. हिटलरच्या सैनिकांनी त्याच्याविरुद्ध षड्यन्त्र रचले. रशियाने बर्लिनवर आक्रमण केल्यावर हिटलरने ३० एप्रिल १९४५ साली आत्महत्या केली.
0 Comments
Post a Comment