वास्को-द-गामा 'शोध युगातील सर्वात यशस्वी पोर्तुगिज नाविक होते. युरोपहून भारतात पोहोचणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनीच गोव्यात पोर्तुगिजांची वसाहत स्थापन केली..


डॉम वास्को द गामांचा जन्म १४६० साली झाला. त्यांचे वडील अॅस्टेवाओही संशोधक होते. नौका परिवहनाचे काम वास्को-द-गामा नौसेनेत राहून शिकले. व त्यांनी त्यातच पुढे भविष्य घडवले आणि इतिहास रचला. १४९७ साली भारतात जाण्यासाठी एक सरळ रस्ता शोधण्यास निघालेल्या जहाजाच्या कॅप्टनपदाची सूत्रे त्यांच्याकडे होती.


८ जुलै १४९७ साली वास्कोच्या पहिल्या शोधयात्रेचा प्रारंभ झाला. २०० टन वजनाचे सेंट गॅबब्रिएल नावाचे जहाज ते स्वतः चालवित होते. त्यांचा लहान भाऊ पाउलो; सेंट राफेल नावाच्या जहाजाचे नेतृत्व करत होता. आफ्रिकेच्या दक्षिणेकडून केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते साशंकतेनेच हिंदी महासागरात घुसले. येथे त्यांचे बरेच नाविक स्कव्ह (हिरड्यांमधून रक्त येणारा रोग) रोगाची शिकार झाले. वास्को मोपीक येथे खाण्या-पिण्याचे सामान भरण्यासाठी थांबले. यानंतर पुढे मोबासा येथे थांबले. तेथून एक अनुभवी अरब नाविक अहमद इब्र माजिदला आपल्याबरोबर घेतले. २८ मे १४९८ साली ते कालिकत (सध्याचे कोझीकोड) च्या किनारी उतरले. कालिकतच्या प्रशासकांनी मसाल्याच्या व्यापारासाठी वास्कोशी करार केला आणि त्यांचे सर्व मसाले विकत घेतले. यामुळे अरबस्तानमधील मुस्लिम मसाला व्यापाऱ्यांना नुकसानाला तोंड द्यावे लागले आणि यातून स्पर्धा वाढली.

     तीन महिने भारतात राहिल्यावर वास्को ऑगस्टमध्ये कालिकतहून रवाना झाले. पावसाळ्याची सूचना मिळूनही कसलीही पर्वा न करता ते निघाले, पण पुढे त्यांना वादळांशी सामना करावा लागला. आधी जो रस्ता तीन तासात कापत होता, त्याला आता तीन महिन्याहून अधिक वेळ मोजावा लागला बऱ्याच नाविकांचा मृत्यूही झाला नाविकांच्या कमतरतेमुळे सेंट राफेल जहाज तर जाळून नष्टच करण्यात आले वास्कोच्या भावाचीही तब्येत बिघडल्याने त्याचाही मृत्यू झाला


वास्कोची ही यात्रा खूपच घडामोडींची होती. त्यांच्या १७० नाविकांपैकी ५४ नाविक जिवंत राहिले, पण पोर्तुगालमध्ये त्यांचे भव्य स्वागत केले गेले त्यांना अॅडमिरल करण्यात आले. पुढे कॅटरिना द ॲटैडशी ते विवाहबद्ध झाले


१५०२ साली ते पुन्हा २० लढाऊ जहाजांबरोबर भारताकडे रवाना झाले पोर्तुगीजचा राजा मॅन्युअल भारतात आपली वसाहत बनवू इच्छित होता वास्कोने प्रवासात शेकडो मुसलमान व्यापाऱ्यांची हत्या केली. बऱ्याच व्यापारांना तोफेने उडविले. अगदी मक्केहून परतणाऱ्या जहाजातील बायका, मुलांसह असणाऱ्या १८० प्रवाशांनाही सोडले नाही.


कालिकतला पोहोचून त्यांनी सर्वात मोठे हत्याकांड केले व्यापारी पेठा नष्ट करून कालिकतच्या राजाला आत्मसमर्पण करावयास लावले त्यानंतर ते दक्षिणेस कोचीन येथे पोहोचले. तेथे जाऊनही सर्व मसाले व्यापारांवर आपली पकड मजबूत केली. १५०३ साली पोर्तुगालला परतताना त्यांनी रस्त्यात मोझांबिक येथे आपली • व्यापारी पेठ उघडली. त्यानंतर मोझांबिकमध्ये पोर्तुगीझांची मोठी वसाहत तयार झाली


राजा मॅन्युअलच्या मृत्यूनंतर राजा जॉन तृतीयने भारतातील पोर्तुगाल अधिकारांच्या भ्रष्टाचारामुळे वास्कोला पुन्हा भारतात जाण्याचा आग्रह केला १५२४ साली ते तिसऱ्यांदा भारताकडे रवाना झाले. यावेळेस व्हाइसरॉयच्या रूपात ते परतले; पण २४ डिसेंबर १५२४ साली कोचीनला पोहोचताच अज्ञात रोगाने त्यांचा बळी घेतला कोचीनच्या एका चर्चमध्ये त्यांना पुरण्यात आले १५३८ साली त्यांचे अवशेष पोर्तुगालमध्ये आणले. त्यांच्या सन्मानार्थ गोव्यातील एका भागाला असे नाव देण्यात आले आहे.