स्टीफन हॉकिंगचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला त्यांचे वडील फ्रेक हॉकिंग जीवशास्त्रज्ञ होते. त्यांची आई इसोबेल हॉकिंग राजकीय कार्यकर्ता होती. त्यांना दोन बहिणी- फिलिया आणि मेरी तसेच एक भाऊ एडवर्ड होता.
१९५३ ते १९५८च्या दरम्यान त्यांचे प्रारंभिक शिक्षण उत्तर लंडन येथे झाले तिथे ते गणित विषयाकडे आकर्षिले गेले. पण त्यांना वैद्यकीय क्षेत्रात पाठविण्याची वडिलांची इच्छा होती. त्यांनी ऑक्सफर्डमधून भौतिकशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळविले आणि त्यानंतर ते विश्वउत्पत्ती शास्त्र व सामान्य सापेक्षतेवर संशोधन करू लागले. त्यांना वयाच्या २१व्या वर्षी एका असाध्य रोगाने-मोटर न्यूरॉनने- जखडले. या रोगामुळे चलनवलन, तसेच बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तरीही त्यांचे संशोधनाचे काम सुरूच होते. या रोगामुळे दोन वर्षांत त्यांचा मृत्यू होईल असे सांगितले गेले होते.
१४ जुलै १९६५ साली जेन वाइल्डेबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांचा पहिला वैज्ञानिक शोध 'ऑन द हॉएल-नारळीकर थिअरी ऑफ ग्रॉव्हिएशन' हा 'प्रेसिडिंग ऑफ द रॉयल सोसायटी मध्ये प्रकाशित झाला. १९६६ साली त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. यानंतर त्यांनी विर्कवेक कॉलेज, लंडनमध्ये कार्यरत गणिततज्ज्ञ रोजर पेनरोजसह कृष्ण विवरावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. १९७० साली क्वांटम सिद्धान्त आणि सामान्य सापेक्षतांचा उपयोग करून कृष्ण विवरापासून विकिरण उत्सर्जनाचे प्रयोग करण्यात यश मिळाले.
१९७३ साली त्यांनी केंब्रिजमधून गणित तसेच सैद्धान्तिक भौतिक विभागात काम करण्यास सुरुवात केली. कृष्णविवरामुळे अंतरिक्षात ऊर्जेचे आणि कणांचेउत्सर्जन होते, इतकेच नाही तर त्यातून प्रखर ऊर्जेचे झोत बाहेर पडू शकतात. हस समज त्यांनी संशोधनाद्वारे चुकीचा ठरविला. त्यांचे हे स्फोटक संशोधन १९७४ माली 'नेचर' नियतकालिकात 'ब्लॅक होल एक्सप्लोजन' शीर्षकाने प्रकाशित झाले. त्याच वर्षी आजारपण वाढल्याने त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम झाला, पलंगावरून उठणेही बंद झाले. १९७७ साली ते केंब्रिजमध्ये गुरुत्वाकर्षणीय भौतिकशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्त झाले आणि १९७९ साली केंब्रिजमध्ये गणिताचे ल्युकेशिअन प्रोफेसर झाले. (केंब्रिज विद्यापीठ इंग्लड येथे १६६३ साली हेन्री लुकास यांनी गणिताच्या प्राध्यापकांसाठी निर्माण केलेले हे पद आहे.) या पदाचे पहिले मानकरी आयझॅक बॅरो होते (१६६९ साली आयझॅक न्यूटन या पदावर होते.) १९८२ साली त्यांना ब्रिटिश महाराणीने 'कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' उपाधी प्रदान केली १९८८ साली त्यांचे 'अब्रीक हिस्ट्री ऑफ टाइम' (काळाचा संक्षिप्त इतिहास) पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक १९९८ साली गिनीज बुक ऑफ रेकॉर्डद्वारे सर्वाधिक विक्रीच्या पुस्तकांमध्ये नोंदविले गेले. फेब्रुवारी १९९० साली त्यांचा पत्नी जेन वाइल्डेशी घटस्फोट झाला. १९९५ साली त्यांनी आपली नर्स एलिना, मेसनबरोबर दुसरा विवाह केला. १९९८ साली 'द कॉसमॉस एक्सप्लैंड' पुस्तक प्रकाशित झाले, ज्यात आपल्या अस्तित्त्वाबद्दल, तसेच आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे • वर्णन केले होते. २००१ साली 'युनिव्हर्स इन अ नटशेल' पुस्तक प्रकाशित झाले, यात भौतिकी शोधांच्या रहस्यांचा उलगडा केला गेला आहे.
२००६ साली दुसऱ्या पत्नीशीसुद्धा घटस्फोट झाला. १२ ऑगस्ट २००९ साली अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाद्वारे त्यांना अमेरिकेचा 'सर्वोच्च नागरिक सन्मान राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले गेले. ८ जानेवारी २०१४ साली त्यांनी आपला ७२ वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या २१व्या वर्षी केले गेलेले मृत्यूचे भाकीत खोटे ठरवत ते आज वयाची ७५ वर्षे यशस्वी आयुष्य जगत आहेत.
3 Comments
Masta mahiti ahe
ReplyDeleteKup mast information 😉
ReplyDeleteStephen Hawking is on of the best scienctist and person thank you for information about the great scienctist
ReplyDeletePost a Comment