लिओनादों द विंचीचा जन्म १९४५२ साली इटलीतील प्रसिद्ध शहर फ्लोरेन्स जवळील विंची गावात झाला. त्यांचे वडील गावातील अधिकारी, तर आई खानावळीत नोकरी करत असे. विंचीचे बालपण आजोबांकडे गेले.

शाळेत असतानाच विंचींच्या प्रतिभेचे कंगोरे दिसू लागले गणिताची कठीण समीकरणे ते सहज सोडवत. याच दरम्यान चित्रकलेतही त्यांची गती दिसू लागली. ते वयाच्या १६ व्या वर्षी आन्द्रेआ देल वरोंचिओ येथे अॅप्रेंटिस झाले. २६ वर्षांचे असताना ते कलाकार संघाचे सदस्य झाले त्या दरम्यान त्यांनी घोड्याच्या डोक्याच्या आकाराची वीणा तयार केली. या वीणेने प्रभावित होऊन, मिलानचा राजा ड्यूक लूदोविको स्फोजोने विंचीला संरक्षण दिले. विंचीने बऱ्याच नवनवीन योजना ड्यूकला दाखविल्या. ज्यात नवीन शहर वसवणे आणि युद्धासाठी शस्त्रे तयार करणे या सोजनांचा समावेश होता. पण कदाचित ड्यूकला यातील कोणतीही योजना पसंत पडली नसावी. शेवटी ड्यूकसमोर त्यांनी 'दि लास्ट सपर' हे सुंदर चित्र प्रस्तुत केले; सांता मारियाचे रिफेक्टरों काढण्याचे आदेश ड्यूकनेच त्याला दिले होते...

मिलानमध्ये राहताना त्यांना 'शरीररचना विज्ञाना'त (अॅनॉटॉमी) आवड निर्माण झाली. त्याकाळी ते प्रसिद्ध डॉक्टरांकडे जाऊन मृतव्यक्तीची चिरफाड करताना बघत असत. याचा परिणाम म्हणजे मानवाच्या शरीरातील सूक्ष्म विश्लेषणही लिओनार्दोच्या चित्रांमध्ये दिसून येते पुढे फ्रान्सच्या राजाने ड्यूक स्फोजोला पकडून कैद केले यामुळे

लिओनार्दोवर कोणाचेही छत्र उरले नाही. या संकटकाळातून ते व्हेनिस येथेगेले तिथे गेल्यावर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले युद्धासंबंधीचे संशोधन दाखविले. त्यात पाणबुड्यांसाठी खास प्रकारचा पोशाख, तसेच विविध प्रकारच्या पाणबुड्यांचाही समावेश होता. काही काळ ते सेसारे बोर्गिया येथे नकाशा तयार करण्याचेही काम करत असत.

इ. स. १५०० मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी ते मातृभूमी फ्लॉरेंन्सला परतले आणि सहा वर्ष तेथेच मुक्काम केला. या कालावधीत त्यांनी 'मोनालिसा'चे प्रसिद्ध चित्र तयार केले. त्यावेळी समकालीन अन्य प्रसिद्ध कलाकार व्हेटिकनचे सिल्टीन चर्चचे चित्र काढत होते. लिओनार्दोही रोमला पोहोचले. पण त्यांना एकही काम मिळाले नाही मनुष्याच्या शरीराच्या आत डोकावून त्याही विषयावरील चित्रे त्यांनी काढली असल्याने लोकांना त्यांची चित्रे आवडत नसत. या उपेक्षेने इटली सोडून गेलेले विंची कधीही घरी परतले नाहीत. आयुष्यातील शेवटचे क्षण त्यांनी फ्रान्सच्या राजाची सेवा करण्यात घालविले लिओनार्दोनेच्या चित्रशैलीत आज काही फरक झालाच असेल, तर लाकडाऐवजी स्टीलचा वापर होऊ लागला आहे; परंतु आजही ते काम लियोनार्दो दा विंचीने मांडलेल्या सिद्धान्तांवर केले जात आहे २ मे १५१९ त्यांचे निधन झाले.