प्रसिद्ध वैज्ञानिक लुई पाश्चरचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली फ्रान्समधील जुरा भागातील डोले या स्थळी नेपोलियन बोनापार्टच्या सैनिकाच्या घरी झाला लुई लहानपणापासूनच दयाळू होते लहानपणी त्यांनी गावातील आठ जणांना पिसाटलेल्या लांडग्यांना मारताना बघितले होते त्यांच्या विव्हळण्याचा आवाज ते कधीच विसरू शकले नाहीत तरुणपणीही या घटनेची आठवण येताच ते बेचैन होत ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते, पण त्यांच्यात जिज्ञासा आणि धैर्य हे कोणत्याही वैज्ञानिकामध्ये आवश्यक असणारे गुण होते


कॉलेजच्या अभ्यासानंतर लुईने आपले लक्ष्य साधण्यासाठी रसायनशाळेत काम करण्यास सुरुवात केली तिथे त्यांनी अभ्यास करून काही महत्त्वपूर्ण शोधही लावले. १८४१ साली फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी लुईसला दिजोन येथील विद्यालयात भौतिकशास्त्र शिकविण्यासाठी नियुक्त केले एका वर्षांनंतर लुईला स्ट्रोसबर्ग महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक करण्यात आले महाविद्यालयात अध्यक्षांची मुलगी होती, तिचे नाव मेरी होते लुई मेरीकडे आकर्षिले गेले आणि दोघांनी लग्न केले


एक दिवस लुईला दारू तयार करणारे काही लोक भेटण्यासाठी आले त्यांनी विचारले की, दरवर्षी आमची दारू आंबट होते. याचे कारण काय? लुईने आपल्या सूक्ष्मदर्शी यंत्राने दारूचे परीक्षण सुरू केले आणि त्यांच्या लक्षात आले अत्यंत सूक्ष्म जिवाणू दारू आंबट करतात पण नंतर त्यांनी दारू २० ३० मिनिटे ६० सेंटिग्रेडवर गरम केल्यावर ते जीवाणू नष्ट झाल्याचे आढळले यामुळे दारूच्या चवीत काही फरक पडला नाही. पुढे दूध शुद्ध बनविण्यासाठी हीच प्रक्रिया अवलंबिली गेली.त्याचदरम्यान फ्रान्सच्या कोंबड्यांमध्ये 'कॉलऱ्याची' भयंकर साथ पसरली होती. तेव्हा कोंबड्या पाळणाऱ्यांनी लुईची मदत घेतली लुईने रोगाच्या जीवाणूंचा शोध लावला, त्यांनी जीवाणूंना दुर्बल करून इंजेक्शनच्या साहाय्याने कॉलऱ्याच्या विषाणूंना नष्ट केले त्यानंतर त्यांनी गायी- बकऱ्यांच्या एका ससर्गजन्य रोगावर देखील व्हॅक्सिनेशन बनविले


लुई पाश्चरने विविध प्रकारचे हजारो प्रयोग केले ज्यात बरेचसे प्रयोग • खतरनाकही होते ते विषारी व्हायरस असणाऱ्या कुत्र्यांवर प्रयोग करत यातूनच त्यांनी रेबीजचा शोध लावला या विषाणूला त्यांनी चांगल्या कुत्र्यांच्या शरीरात टाकले. चौदा इंजेक्शननंतर कुत्रा रेबीजपासून सुरक्षित झाला. त्याचे हे संशोधन खूप महत्त्वाचे ठरले, पण तोपर्यंत त्यांनी मानवावर हा प्रयोग करून बघितला नव्हता. १८८५ सालातील गोष्ट आहे. एक महिला आपल्या नऊ वर्षीय मुलाला बोसेफला घेऊन त्यांच्याकडे गेली, ज्याला दोन दिवसापूर्वी पिसाळलेला कुत्र्याला चावला होता


लुई पाश्चर, त्या जोसेफला इंजेक्शन द्यावे की नाही या दोलायमान स्थितीत होते शेवटी त्यांनी उपचार करण्याचा निर्णय घेतला दहा दिवसांपर्यंत ते बोसेफवर उपचार करत राहिले आणि जोसेफचा जीव वाचवला.


पहिल्यांदाच मनुष्याला रेबिजपासून वाचविण्यासाठी इंजेक्शन दिले गेले या यशस्वी प्रयोगामुळे एक नवी क्रांती घडली आणि त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या लुई पाश्चरला पुरस्कार देऊन फ्रेंच सरकारने सन्मानितही केले. त्यांच्या सन्मानार्थ पाश्चर इन्स्ट्यूिटचीदेखील स्थापना केली गेली. या महान वैज्ञानिकाचे २८ सप्टेंबर १८९५ साली निधन झाले