अल्बर्टना बघून वाटतही नसे की ते वैज्ञानिक होते त्यांना सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून गणले जाते. त्यांनी क्रांती घडविणारे सिद्धान्त मांडले १९१७ साली सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली. त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित केले गेले साधारण पेहराव पण काम असाधारण अशा या व्यक्तींचा जन्म जर्मनीत १८७९ साली उल्म येथे एका सामान्य कुटुंबात झाला. विक्रेता म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांनी पुढ विदयुत रासायनिक पदार्थाशी निगडित कारखाना काढला. अल्बर्टची आई गृहिणी होती. त्यांच्या आईची आपला मुलगा प्रोफेसर व्हावा अशी इच्छा होती आणि ती सफलही झाली.
सन १९०९ मध्ये ते एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून रुजू झाले त्यानंतर काही वर्षांनंतर केसर विल्यम संस्थानाच्या माहाविद्यालयात विज्ञान शाखेचे संचालक झाले. ते फक्त बुद्धिवान वैज्ञानिक नव्हते तर उदार व्यक्तिमत्त्वाचे होते. त्या काळात जर्मनीतील हिंसा, छळ या परिस्थितीने हैदोस घातला होता. ते भावनाशील हृदयाचे असल्याने हे त्यांच्या पचनी पडले नाही. या कारणाने त्यांना जर्मनी सोडण्यास प्रवृत्त केले. त्यांची गांधीजींवर श्रद्धा होती.
गांधीजींच्या मृत्यूनंतर बोलताना ते म्हणाले होते. "अशा प्रकाराची कोणी व्यक्ती खरंच पृथ्वीवर अस्तित्वात होती हे पुढच्या पिढ्यांना पटणारच नाही. " त्यांनी हे तत्कालीन भारताचे राजदूत गगन भाई मेहता यांना सांगितले, "माझी तुलना या महान व्यक्तिबरोबर करू नका. त्यांनी मानवजातीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. मी तर त्यांच्यासमोर काहीच नाही. " त्यांना नोबेल पुरस्कार जाहिर झाल्यावर तो घेण्यासाठी ते स्टॉकहोमला गेले, तेव्हा एका मित्राने अनेक वर्षांपूर्वी भेट म्हणून दिलेला फाटका, विरलेला कोट त्यांनी घातला होता. मात्र या पेहरावाचा त्यांच्या लोकप्रियतेवर काहीच परिणाम झाला नाही. 'एक नूर आदमी, दस नूर कपडा' ही म्हण त्यांनी आयुष्यभर खोटी ठरवली.
नोबेल पुरस्कारानंतर आइन्स्टाइना जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक झाले. 'आइनस्टाइन' या नावाचा अनेक ठिकाणी गौरव होऊ लागला. यामुळे 'अल्बर्ट आइन्स्टाइन'ची व्यापार चिन्ह म्हणून नोंदणी केली. बुद्धिमत्ता व आइन्स्टाइन हे जणू समीकरणच आहे.
आइन्स्टाइन सिद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सर्वकालीन सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून गणले जातात. सापेक्षवादाचा सिद्धान्त, प्रकाशीय, विद्युत परिणाम, विश्वशास्त्र, विश्वरचना शास्त्र, सांख्यिकीय यांत्रिकी आण्विक सिद्धान्त, रेण्विक गती, प्रकाशाचा औष्णिक गुणधर्म, प्रकाशकणांचा सिद्धान्त वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.
अमेरिकेतील प्रिन्स्टन, न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी या शिक्षण संस्थेशी ते शेवटपर्यंत संलग्न राहिले. १८ एप्रिल १९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले. आइन्स्टाइन यांनी संपूर्ण आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आइन्स्टाइन हा शब्द आता बुद्धिमान माणसासाठी प्रतिशब्द झाला आहे!
0 Comments
Post a Comment