स्टीव्ह जॉब्सचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ साली सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव स्टीव्हन पॉल जॉब्स आहे. त्यांच्या आईचे नाव जोआन शिबल आणि सीरियन वंशाच्या वडिलांचे नाव अब्दुल फतेह जंदाली होते. त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला एका कॅलिफोर्नियातील दांपत्याला पॉल आणि क्लारा जॉब्सला दत्तक दिले. दत्तक दिल्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्या खऱ्या आईवडिलांनी लग्न केले आणि त्यांना मोना नावाची मुलगी झाली. पण मोनाला आपल्या भावाबद्दल ती तरुण होईपर्यंत काहीही माहीत नव्हते. स्टीव्ह सिलिकॉन व्हॅलीत जॉब्स दांपत्याकडे लहानाचा मोठा झाला.

ज्ञानाच्या शोधात स्टीव्ह भारतात आले होते. त्यांचा हेतू नीम करोली बाबांना भेटणे हा होता, पण ते भारतात पोहोचेपर्यंत बाबांचे निधन झाले होते. याशिवाय स्टीव्हच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने भारतातील प्रवास महत्त्वपूर्ण ठरला! एडिसनने जगाला अधिक चांगले बनविण्यात योगदान दिले. जितके कार्ल मार्क्स आणि नीम करोली बाबा एकत्रितही देऊ शकले नसते. ही गोष्ट लक्षात घेऊन स्ट्रीव्ह भारतातून परतले आणि आपल्या ध्येयाकडे वळले.

वयाच्या २१ व्या वर्षी स्टीव्हने आपला मित्र वोजनॅकसह 'अॅपल' नावाची कंपनी स्थापन केली. लॉस आल्टोसमध्ये असलेल्या गॅरजमध्ये १३०० डॉलरमधून त्याने या कंपनीची सुरुवात केली. बोजनॉकने अॅपल १ कॉम्प्युटर डिझाईन केला. तेव्हा स्टीव्हने आपल्या साथीदारांना प्रेरणा दिली की हा कॉम्प्युटर विक्रीसाठी बाजारात गेला पाहिजे. अॅपल १ कॉम्प्युटर यशस्वीपणे बनविण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिझाईनची जबाबदारी वोजनॉकवर सोपविण्यात आली तसेच मार्केटिंगची जबाबदारी स्टीव्हावर होती.

यानंतर क्यूपरटिनो येथे अॅपलचे छोटेसे ऑफिस उघडले. स्टीव्हच्या नेतृत्वाखाली अॅपलने, जगभरात उत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करून दिली यातील आयमॅक मॅकितीश, अॅपल - २, आयफोन, आयपॉड, आयपॅड यासारख्या उत्पादनांमुळे जगात त्यांच्या कंपनीने ख्याती मिळवली

१९८५ साली स्टीव्हला स्वतःच्या कंपनीतूनच बाहेर काढले गेले त्यांनी हार न मानता पिक्सार आणि नेक्स्ट नवीन कंपन्याची स्थापना केली. पिक्सारचे अॅनिमेशन चित्रपट हिट होत राहिले नेक्स्ट फ्लॉप झाली आणि अॅपलने १९९६ साली नेक्स्ट विकत घेतले. याप्रकारे स्टीव्ह अॅपलमध्ये परतले आपल्या संघर्ष काळात स्टीव्ह जे शिकले. त्यानुसार त्यांनी अॅपल पूर्णपणे बदलले अॅपलच्या आय मॅक कॉम्प्युटरने लोकांना वेड लावले स्टीव्हने कधीही कॉम्प्युटर डिझाइन केला नव्हता, तरीही त्यांच्यामुळे अॅपल सर्वात वेगळी मानली जातात स्टीव्हने कुठलेही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले नसून ३००हून अधिक अमेरिकन पेटंट त्याच्या नावावर आहेत हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते

स्टीव्हने गरेजपासून सुरुवात करून 'अॅपल' ही ३५० अरब डॉलरची यशस्वी कंपनी उभी केली त्यांच्या टेक्नॉलॉजीने पर्सनल कॉम्प्युटर, म्युझिक, मोबाइल फोन यांचे जगच बदलून टाकले खरं तर स्टीव्हची काम करण्याची पद्धत त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांना कठीण जाते पण लोकांना कोणती उपकरणे आवडतील याची समज स्टीव्हला असल्याने 'अॅपल' जगातील लोकप्रिय ब्रँड ठरला ५ ऑक्टोबर २०११ साली त्यांचे निधन झाले