नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती होते ते इथल पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती होते त्यांनी आयुष्याची २७ वर्षे वर्णभेदाविरोधात लढताना रॉबिन द्वीप कारागृहात काढली.

त्यांचा जन्म १८ जुलै १९९८ रोजी मबासा नदीकिनारी ट्रॉक्सी गावात झाला. त्यांचे वडील गेडला हे नरी गावाचे सरपंच होते. त्यांची आई मेथडरर होती. मडलांनी मेथोडिस्ट मिशनरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला ते बारा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. पुढे त्यांनी प्राथमिक शिक्षण क्लार्क बेरी मिशनरी स्कूलमधून पूर्ण केले

मंडेला यांनी डेल्डटाउनमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले हेल्डटाउन हे फक्त कृष्णवर्णीयांसाठीचे महाविद्यालय होते. इथेच त्यांची भेट ऑलिवर टावी यांच्याशी झाली, जे पुढे जाऊन त्यांचे मित्र व सहकारीही झाल १९४० सालापर्यंत मंडेला व टांबो यांनी कॉलेजमध्ये राजनैतिक विचारांसाठी आणि कार्यासाठी प्रसिद्धी मिळवली महाविद्यालयीन संस्थापकांना ही गोष्ट कळताच त्यांनी या दोघांना काढून टाकले.

मंडेलांचे कुटुंब त्यांच्या क्रांतिकारी विचारामुळे चिंताग्रस्त झाले होते म्हणून त्यांचे लग्न करून देऊन त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा विचार केला मंडेला घर सोडून जोहान्सबर्गला पळून गेले तिथे ते सान्याच्या खाणीत राखणदाराची नोकरी करू लागले ही नोकरी सोडून ते एका वकिलाकडे कारकुनी करू लागले यादरम्यान त्यांच्या मनात वर्णभदाविरुद्ध संघर्ष करण्याचा विचार अधिकच दृढ होत गेला

१९४४ साली मंडला इव्हलिस मेस हिच्याशी विवाहबद्ध झाले. यानंतर त्यांनी काही सहकाऱ्यांसह ' आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यूथ लीग'ची स्थापना केली. १९४७ साली ते या संस्थेचे सचिव झाले. त्याचबरोबर त्यांच्यावर ट्रान्सवाल ए. एन. सीचा कार्यभार सोपविण्यात आला. १९५१ साली मंडेलांची यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी आपल्या लोकांच्या कायदेशीर लढाईसाठी १९५२ साली एका वकिली फर्मची स्थापना केली.

आंदोलनात व्यस्त असल्याने ते कुटुंबासाठी वेळ काढू शकत नसत, त्यामुळे त्यांची पत्नी इव्हलिस त्यांना सोडून गेली. वर्णभेद आंदोलनातील १५६ कार्यकत्यांसह मंडेलांनाही अटक करण्यात आली. पुढे १९६१ साली त्यांची कैदेतून मुक्तता झाली. या खटल्यादरम्यान त्यांची भेट नोमजानो विनी हिच्याशी झाली आणि ते तिच्याशी विवाहबद्ध झाले. मंडेला जगविख्यात होऊ लागले होते. पुढे त्यांना अटक होऊन पाच वर्षांची शिक्षा झाली. आम जनतेपासून दूर ठेवण्यासाठी रॉबिन द्वीप येथे त्यांची रवानगी करण्यात आली.


१९८९ साली दक्षिण आफ्रिकेतील सत्तेत परिवर्तन झाले आणि एफ डब्ल्यू. क्लार्क हे राष्ट्राचे प्रमुख झाले. सत्तेत येताच त्यांनी कृष्णवर्णियाविरुद्धचे निर्बंध काढून घेतले. त्याचबरोबर संबंधित राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यातच मंडेलांची सुटका झाली. १९९१ साली कृष्णवर्णियांचे अधिकार मिळवून देण्यासाठी 'कन्व्हेन्शन फॉर अ डेमोक्रेटिक साऊथ आफ्रिका संघटनेची स्थापना झाली. या संघटनेने देशाच्या संविधानात परिवर्तन घडवून आणले. डी क्लार्क व मंडेला यांनी या कामात समान योगदान दिले. याच नेत्रदीपक कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काने सन्मानित केले गेले. त्याचप्रमाणे १९९० साली भारत सरकारने मंडेला यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित केले.

सन १९९४ मध्ये मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती झाले. १९९७ साली ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. विनी मंडेलापासून वेगळे झाल्यावर त्यांनी आपल्या ८०व्या वाढदिवशी ग्रेस मेकल हिच्याशी विवाह केला.

लोकांच्या मते मंडेला आता निवृत्त झाले आहेत, पण ते स्वतः असे मानत नाहीत. ते म्हणतात, "मी असे स्वप्न बघितले आहे. सर्वांना शांती लाभो, काम मिळो, कोणीही अन्न पाण्यापासून वंचित न राहो, आपण सर्वांच्या गरजा व जाणिवा पूर्ण करू शकतो. असे विश्व निर्माण करण्यासाठी अजून बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. तर आपण प्रयत्नशील राहू यात.'