आपल्या व्यक्तिमत्त्वातील दिव्यत्वाचा गाभा जणू पाच कोषांनी आवृत आहे


शारीरिक कोश -      ह व इंद्रिये यांचा अंतर्भाव होतो. 


प्राणमय कोश -         ह्यात अन्नाचे पचन रक्ताभिसरण, श्वासोश्वास व शरीरातील प्राण संचालनाच्या इतर                                         क्रिया यांचा अंतर्भाव होतो. 


मनोमय कोश-      यात मनाच्या जसे विचार करणे भावना व संवेदना इत्यादींचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे
                             

आनंदमय  कोश -     यातील आनंद आपल्या गाढ झोपेत (सुषुप्तीत) आपण अनुभवतो.


एकामागून एक येणारा प्रत्येक कोश उत्तरोत्तर सूक्ष्म, सूक्ष्मतर होत जातो व व्यापून राहतो व्यक्तिमत्त्व विकासामधे व्यक्तिमत्त्वाच्या उच्चतर आयामांशी तद्रूप होणे अंतर्भूत होते अशाप्रकारे जेव्हा आपल्या मनाच्या उच्चतर क्षमता अर्जित करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती देहाशीच तादात्म्य पावते तेव्हा तो पशूहून फार वेगळे असे जीवन जगत नाही आणि तिचे सुखदुःख इंद्रियबद्ध चाकोरीतच सीमित असते

इच्छा वासना जुन्या सवयी चुकीच्या आवडी निवडी, वृत्ती व संस्कार यांनी युक्त असलेल्या खालच्या मनाशी संघर्ष विकासाचा भाग असतो खालच्या प्रतीच्या मनाशी आपण जितके कमी तादात्म्य पावू व उच्च मनाशी जितके जास्त तादात्म्य पावून आपण आपल्या बुद्धीचा (विवेकाचा) कस लावू तितके आपले व्यक्तिमत्त्व विकसित होईल. यात स्वतःच्या मनाशी, जुन्या सवयींशी संघर्ष करून नवीन व निकोप सवयींनी युक्त मन तयार करणे आवश्यक आहे. परंतु हा संघर्ष सर्व संघर्षांहून कठीणतम कार्य आहे त्यात आपले दिव्यत्व व आपले लपलेले पूर्णत्व प्रकट करून खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत बनत असतो.