मी माझी मिशी निरखत होतो ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती कसा आकार होईल तिचा? मला मिशी हवी थोडीशी रुंद. ओठांवरून किंचित उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकावर येताच झटकन खाली वळणारी माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यासमोर काही चेहरे तरळू लागले मी गुंग होत गेलो खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला मी चटकन इकडेतिकडे पाहिले पण समोरचा आरसाच मला हसत होता, हे कळायला फार वेळ लागला नाही
वा! वा! किती छान गुंग झाला होतास, नाही का? पण ते जाऊ दे. तुम्हां माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे!
'हे बघ प्रत्येक माणसाचं स्वत वरच सर्वांत जास्त प्रेम असतं. आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती, कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतःला पाहिले असणारच आणि पाहता
पाहता मुठा आवळून, हात उंचावून माझा विजय असो असं मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वत चा जयजयकार केला असणारच, हे लक्षात ठेव तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे. मीच तुमची प्रगती घडवून आणतो
'आठवते का रे? जत्रेत आपली भेट झाली होती। किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो! तू तर नुसता लोटपोट हसत होतास. तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या! गोलगरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी किती प्रतिमा! एका आरशातली प्रतिमा आठवते? डोकं मोठ्ठं भोपळ्याएवढं बाकीचा देह दोन-अडीच फूट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण !
लक्षात ठेव ही माझी रूपं केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो वेगवेगळी भिंगे ही माझीच रूपं आहेत प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींपर्यंत सर्वत्र मीच असतो घरात, दारात, कपड्यांवर, दुकानांत, रस्त्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच असतो पण लक्षात ठेव, मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही
पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतः लाच स्वतःचे दर्शन घडले असणार तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. मी स्वतःला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे. तूसुद्धा अशीच मदत करीत राहा पाहा, केवढा मोठा होशील तू!
0 Comments
Post a Comment